प्रातिनिधिक
 
प्रा.अरुण कांबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही साईट काढावी, हा हेतु समोर ठेउन आम्ही कामास सुरुवात केली. त्यांच्या जीवनाविषयी माहिती देणारी वेबसाईट काढायचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत. प्रा. अरूण कांबळेंच व्यक्तिमत्व उत्तुंग होत. त्यांच स्मारक हे खऱ्या अर्थाने त्यांचे विचार. दलित, शोषित, पिडित, कामगार यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात विचार करून त्यांचा सर्वंकश विकास व्हावा हे त्यांना वाटे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सामर्थ्याने हे कार्य पूर्ण होईल हा विश्वास त्यांच्यात होता. मागास समाजाला प्रबोधनाच्या वाटेवर नेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या सर्व गोष्टींचा विचार समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

ही साईट करत असताना चर्चात्मक स्वरूपाचा एक मंच यावा ही कल्पना पुढे आली. त्यावर एक प्रयोग म्हणून भारतीय दलित पॅंथर ऑफ ईंडिया हा फोरम आम्ही प्रयत्न पूर्वक सुरू करत आहोत. अनेक विविध सामजिक विषयांवर चर्चा घडून यावी असा हेतू. हे सर्व करत असताना यात सर्वांचा सहभाग असावयास हवा तरच त्याला काही अर्थ उरतो. याच अपेक्षेने हे पाऊल............