चरित्र
 
   
  अरुण कांबळे यांचा जन्म १४ जानेवारी १९५३ रोजी झाला. सांगली जिल्हयातील करगणी हे गाव. तालुका आटपाडी. त्यांचे वडिल कृष्णाजी कांबळे आणि आई शांताबाई कांबळे. जन्माने दलित, जात महार. जातियतेच्या असंख्य हिन घटनांनी ग्रासलेल जीवन. अशिक्षा त्यामुळे वाट्याल्या आलेल दारिद्र्य, सामाजिक कनिष्ठ स्तर या वातावरणात वर्षानुवर्षे खितपत पडलेल कांबळे घराण. या घराण्यात शिकलेला पहीला माणूस कृष्णाजी कांबळे. प्रतिकूल परिस्थिति भेदून शिक्षण पूर्ण केल. त्यांच्या आई शांताबाई कांबळे - पूर्वाश्रमीच नाव नाजूका बाबर - यांची सुध्दा तीच परिस्थिती. या कुटुंबाने प्राप्त स्थितीला छेद देऊन स्वत:च शिक्षण पूर्ण केल, शिक्षण क्षेत्रात नोकरी स्विकारली.

अरूण कांबळेंची आई आणि वडील ही दोन दैवत ! यांनी अरूण कांबळेंवर लहानपणा पासून बाबासाहेबांच्या विचारांचा संस्कार केला. सगळ्या भावंडात ते तिसरे. त्यांच प्राथमिक शिक्षण आटपाडी तालुक्यातील करगणी, दिघंची येथे, तर माध्यमिक शिक्षण आरवाडे हायस्कुल सांगली येथे झाल. महाविद्यालयाच शिक्षण घेत असताना, मुंबईत दलित पॅंथर स्थापनेच्या बातमी मुळे सांगली मध्ये पॅंथरची छावणी सुरु केली. अरूण कांबळेंची पहीली बातमी वर्तमान पत्रात पहिल्यांदा सांगलीत याच कालावधित झळकली. सांगली मध्ये एक पुजाऱ्याने दलित कुटुंबाला प्रवेश नाकारला, आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून अरुण कांबळेंनी मोर्चा काढला अशी ती बातमी आहे.

१९७४ साली मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात एम.ए. साठी प्रवेश घेतला. चळवळीच काम या दिवसात त्यांना जबरदस्त ताकदिने करण्याची संधी मिळाली. याच काळात दलित समाजातले तरूण एकत्र येत होते. या कॉलेज युवकांच्या वारंवार बैठका होत असत. पॅंथरच्या युवकांचा एक मोठा गट तयार होत होता. वरळी मधल्या दंगलीचे पडसाद घुमत होते. अरूण कांबळेंच वक्तृत्व प्रभावी होत. या वक्तृत्वाच्या माध्यमाने मुंबईमध्ये चळवळीला नवा जोश आला होता. १९७६ साली एम.ए. पूर्ण झाल्यावर भारतीय दलित पॅंथरची धुरा नेत्रुत्वाच्या दिशेने त्यांच्या हाती आली. त्याच दरम्यान ते पीपल्स एड्युकेशनच्या - बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ़ कॉमर्स ऍंड इकॉनॉमिक्स , वडाळा येथे प्राध्यापक नात्याने रुजू झाले. १९७८ साली ओव्हल मैदानात एक विराट मोर्चा काढला. त्याच नेतृत्व अरूण कांबळेंनी यांनी केल. पूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते या मोर्चा साठी आले होते. १९७९ रोजी त्याच लग्न अवनी कांबळे यांच्यांशी झाल. १९८२ साली त्यांनी लिहीलेल्या रामायणातील संस्कृती संघर्ष या पुस्तकाने रान उठवल.