भुमिका
 
ही साईट नसून एक वैचारीक चळवळीचा मंच आहे. आमची भुमिका सर्वार्थाने समाजाचे प्रश्न - जे दिवसागणिक तीव्र स्वरूप घेताहेत - यासाठी चर्चा व्हावी आणि सामाजिक चळवळींना पूरक असावी अशा स्वरूपाची आहे. दलितांचे प्रश्न हे फक्त दलितांचे नसुन ते संपूर्ण समाजाचे आहेत. या आधारावर विचार केल्यास दिसून येईल की दलित, समाजातील प्रश्नांचे प्रतिनिधित्व करताहेत. यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रीत येऊन दलित चळवळींना वैचारीक पाठबळ, उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची गरज आहे.